मुंबई : मुंबईत अत्यंत बेभान होऊन वेगवान बाईक चालवत एका बाईकस्वारानं पोलीस कॉन्स्टेबलला चिरडल्याची घटना घडली आहे. मुंबईतील सायन परिसरात ही घटना घडली.

सायन हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन बंद, पोलीस कॉन्स्टेबल मरणासन्न अवस्थेत
अपघातानंतर या पोलीस कॉन्स्टेबल नितीन परब यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथेही प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या फटका या परब यांना बसला आहे. रुग्णालयाचं सिटीस्कॅन मशीन बंद असल्यानं त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. सीटीस्कॅन मशीन दुरुस्त करणारा कारागिरही नसल्यानं हे पोलीस कॉन्स्टेबल मरणासन्न अवस्थेत सायन हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल नितीन परब यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं कळतं आहे. मात्र, असं असलं तरी रुग्णालय प्रशासनाला त्याचं काहीच घेणं देणं नसल्याचं दिसतं आहे.