
मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर दोन बोटी साखरपुड्या करिता सजवण्यात आल्या होत्या. बोटीने किनारा सोडल्यानंतर काही मिनिटातच मनाली वाळिंबे आणि रोहन कुलकर्णी यांनी प्यारासेलिंगच्या माध्यमातून उंच आकाशात भरारी घेतली आणि उंच आकाशात असतानाच या दोघांनी एकमेकांना अंगठी घातली.
या अनोख्या साखरपुड्याची दापोलीत चांगलीच चर्चा रंगलेली पहायला मिळते आहे.