पिंपरी चिंचवड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वयंसेवकांना एकत्रित करण्यासाठी आज पिंपरीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
तब्बल 400 एकर जागेवर शिवशक्ती संगमाच्या कार्यक्रमासाठी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी भव्य देखावा उभारला आहे. या नऊमजली देखाव्यावरून सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. कार्यक्रमाच्या परिसरात प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला आहे.
शिवशक्ती संगम कार्यक्रमानंतर स्वयंसेवकांच्या परतीच्या प्रवासात त्यांच्या भोजनाचा प्रश्न चुटकीसरशी मिटवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मॅनेजमेंटचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. यासाठी शिदोरी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एक लाख घरांमधून ही शिदोरी मागण्यात आली आहे. यामध्ये 10 तिखट-मिठाच्या पुऱ्या, शेंगदाण्याची चटणी आणि 2 तिळाचे लाडू देण्याची विनंती संघाकडून करण्यात आली आहे. आज कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित स्वयंसेवकांना ही शिदोरी वितरीत करण्यात येणार आहे.