
पंढरपूर 07 :- युवकामध्ये दडलेल्या या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवुन देणेसाठी, कलासंपन्न व्यक्तींच्या कला समाजासमोर दर्शित होणेसाठी प्रतिवर्षाप्रमाणे दि.पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरच्या वतीने या ही वर्षी राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उमेश विरधे यांनी दिली. बँकेचे चेअरमन आमदार श्री.प्रशांतरावजी परिचारक यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या या राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचे हे 4 थे वर्ष आहे. शनिवार दि.9 जानेवारी 2016 रोजी कर्मयोगी सभागृह, नवीपेठ शाखा, पंढरपूर येथे प्राथमिक फेरीचे आयोजन करणेत
आले आहे.
सदर युवा प्रतिभा महोत्सवामध्ये सुगमगीत, युगुलगीत, वैयक्तिकनृत्य, समूहनृत्य, सुरवाद्य, एकपात्री अभिनय, नाट्यप्रतिभा, चित्रप्रतिभा, शिल्पप्रतिभा, या स्पर्धेचा समावेश आहे. सदर युवा प्रतिभा महोत्सवाची अंतिम फेरी दि.29 ते 31 जानेवारी 2016 रोजी टिळक स्मारक मंदिर, पंढरपूर येथे सायंकाळी ठिक 5.30 वाजता होणार आहे.
सुगमगीत, वैयक्तिकनृत्य, नाट्यप्रतिभा, चित्रप्रतिभा, शिल्पप्रतिभा, एकपात्री प्रतिभा, सुरवाद्य प्रतिभा या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक-5000/-, द्बितीय क्रमांक-3000/-, तृतीय क्रमांक-2000/- रूपयाची, समूहनृत्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक-15000/-, द्बितीय क्रमांक-11000/-, तृतीय क्रमांक-9000/- युगुलगीत स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक-7000/-, द्बितीय क्रमांक-5000/-, तृतीय क्रमांक-3000/- रूपयाची रोख पारितोषिके तसेच आकर्षक सन्मानचिन्ह अशा भरघोस बक्षिसाचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 16 ते 30 वयोगटातील युवकांसाठी खुली आहे.
सदर युवा प्रतिभा महोत्सवाची प्राथमिक फेरी कराड, सातारा, बारामती, पुणे, बार्शी, सोलापूर येथे मोठ्या
उत्साहात पार पडली आहे. याशिवाय लातूर, बीड, सांगली येथे ही प्राथमिक फेरीच्या स्पर्धा होणार आहेत. पंढरपूर येथे शनिवार दि.9 जानेवारी 2016 रोजी कर्मयोगी सभागृह, नवीपेठ शाखा, पंढरपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राथमिक फेरीचे आयोजन करणेत आले आहे.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन बँकेचे व्हा.चेअरमन दीपक शेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी केले आहे. याप्रसंगी बँकेचे संचालक रजनीश कवठेकर, उदय उत्पात, चंद्रकांत निकते, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, हरिष ताठे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, सोमनाथ होरणे, मुन्नागीर गोसावी, रामचंद्र माळी, मनोज सुरवसे, बँकेच्या संचालिका
सौ.रेखाताई अभंगराव, सौ.माधुरीताई जोशी यांचे वतीने करणेत आले आहे. अधिक माहितीसाठी 9637861001, 9623722828, 9049003579, 9822220098, 9890578787, 9850831745 या क्रमांकावर संपर्क साधावा.