पंढरपूर:- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व जिल्हा परिाद सदस्य बाळासाहेब माळी (भोसे), उद्योगपती गुरसाळयाचे विक्रम कोळेकर व भटुंबर्याचे माजी सरपंच नारायण मेटकरी यांनी श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलमध्ये जाहीर प्रवेश केला.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीची रणधुमाळी चालू असतानाच आज अचानक कलाटणी मिळाली. सत्ताधार्यांचे पुर्वाश्रमीचे समर्थक समजले जाणारे बाळासाहेब माळी, विक्रम कोळेकर व नारायण मेटकरी यांनी सत्ताधार्यांच्या भ्रट कारभाराला कंटाळून स्वच्छ प्रतिमा असलेल्या डॉ. बी. पी. रोंगे यांच्या श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी माळी म्हणाले,‘त्या कारखान्यावर आता प्रशासक नेमण्याची वेळ आली असून आमच्या ोतकरी सभासदांच्या हिताच्या विचारांना तिलांजली देणार्या पॅनलला आता तलाख देवून डॉ. रोंगे सरांच्या पॅनलमध्ये जाहीर प्रवेश करत आहे. ‘सर आणखी खूप जण येणार असून सत्ताधार्यांनी आपल्याकडे असणारी नेतेमंडळी तरी आपली आहेत का? याचे आत्मपरीक्षण करावे’ असे म्हणाले. कोळेकर म्हणाले ‘पंधरा र्वााच्या आमच्या श्रमाची जाण नाही त्यामुळे आता येथून पुढे डॉ. रोंगे सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे’ यावर पॅनल प्रमुख डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्वांंचे स्वागत करून ‘आता परिवर्तनाला आणखी बळ आले असून सर्वांंनी एकत्र येवून एक विचाराने लढा देवू असे सांगितले. काही दिवसांपूर्वी विद्यमान संचालक राजाराम सावंत यांनी काही दिवसांपूर्वी भाकीत केले होते. ‘सर तुम्ही बघत राहा, आपल्याकडे कोण कोण येतंय ते मागील एक र्वाापासून ठरत होते. ऐनवेळी ेातकर्यांच्या हिताचीच पार्टी समोर येणार असे संचालक सावंत यांनी सांगितले होते. ते भाकित आज खरे ठरले. तिघांबरोबरच चंद्रकांत माने यांनीदेखील विठ्ठल परिवर्तनला पाठींबा दर्शविला आहे. याप्रसंगी माजी संचालक राजाराम सावंत, ाौकतभार्इ पटेल यांच्यासह स्वाभिमानी व रासपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व जिल्हा परिाद सदस्य बाळासाहेब माळी,विक्रम कोळेकर व माजी सरपंच नारायण मेटकरी यांचा श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे त्यांचे पॅनल प्रमुख डॉ. रोंगे यांच्याहस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.