पंढरपूर लाईव्ह वृत्त:-
सध्या पंढरपूरमधील अनेक ठिकाणी राहिलेली विविध विकासकामे पुर्ण करणे चालु आहेत. कदाचित मार्च महिना अखेर उर्वरीत कामे निधी परत जाऊ नये यासाठी घाईगडबडीत उरकली जात असतील अशी चर्चा आहे. यापैकीच एक म्हणजे सध्या पंढरीतील कांही भागात पाईप भराभरा टाकण्याचे काम चालु आहे. मात्र या कामामुळे अनेक नागरिकांच्या सांडपाण्याच्या पाईप व चेंबर्स फुटू लागल्याचे प्रकार घडत आहेत.
हे फुटलेले पाईप व तुटलेले चेंबर्स नागरिक स्वखर्चाने खाजगी गवंड्यांकडून दुरुस्त करुन घेताना आढळत आहे. यामध्ये नागरिकांना विनाकारण अवाढव्य खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. वास्तविक नागरिकांच्या तुटलेल्या चेंबर्स ची व फुटलेल्या पाईपची दुरुस्ती संबंधितांकडून अधिकार्यांनी करवून घेणे आवश्यक आहे. याचा खर्च संबंधितांकडून वसुल करावा किंवा नागरिकांच्या घरपट्टीतून वसुल करावा मात्र अचानक फुटलेल्या पाईप व चेंबरच्या दुरुस्तीचा भार नागरिकांवर असा टाकू नये. अशी मागणी होताना आढळत आहे.