पंढरपूर (दि.05)
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी निमित्त श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या वतीने करकंब येथे दि.4 रोजी प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी बोलतांना आमदार श्री भारत भालके यांनी श्री विठ्ठल कारखान्याच्या निवडणूकीत विरोधकांकडून चुकीचे आरोप होत असून शेतकरी सभासदांची दिशाभूल केली जात आहे. काहीही झाले तरी शेतकरी सभासद आमच्याच पाठीशी खंबीरपनणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सह.शि.वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन श्री कल्याणराव काळे हे होते.
यावेळी प्रचार सभेत बोलतांना आमदार भालके म्हणाले की, गेल्या अनेक वर्षात श्री विठ्ठल कारखान्याचा कारभार यशस्वीरित्या सांभाळून सभासदांच्या हिताचा विचार केला असल्याने मागील निवडणुकीत आमच्यावर विश्वास टाकून सभासदांनी सेवा करण्याची संधी दिली. मात्र आता केवळ विरोधासाठी विरोध म्हणून विनाकारण भुर्दंड म्हणून कारखान्याची निवडणुक सभासदांवर लादली आहे. खोटे सांगणार्यांवर सभासदांनी विश्वास न ठेवता श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलला सहकार्य करावे असे आवाहन आमदार श्री भारतनाना भालके यांनी केले.
यावेळी बोलतांना संचालक श्री राजुबापू पाटील म्हणाले की, आमदार श्री भारतनाना भालके यांच्या आजवरच्या कामकाजावर कारखान्याचे सभासद समाधानी आहेत. त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध व्हावी ही सर्वांचीच इच्छा होती. परंतु कारखान्याशी काही संबंध नसणार्या मंडळींनी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कारखान्याच्या निवडणुकीत लुडबूड सुरू केली. यापुढील काळात कारखान्याच्या सभासदांच्या ऊसाचे वेळेत गाळप करण्यासाठी विस्तारीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे भविष्यात सभासदांना अतिरिक्त ऊसाचा प्रश्न भेडसावणार नाही.
सदर प्रसंगी सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन श्री कल्याणराव काळे, श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक सर्वश्री मोहनआण्णा कोळेकर, युवराज पाटील तसेच सर्वश्री दिलीप पुरवत, प्रदीप पाटील, नितीन बागल, देशमुख सर आदींची भाषणे झाली.
यावेळी सदर सभेस सर्वश्री बाळासाहेब शिंगटे, पांडुरंग कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन नरसाप्पा देशमुख तसेच अभिजीत पुरवत, देवकतेदादा, सरपंच आदिनाथ देशमुख, राहूल पुरवत, राजाराम भिंगारे, रणजित पाटील,