श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रमुख डॉ. बी. पी. रोंगे सोबत डावीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, कारखान्याचे विद्यमान संचालक, राजाराम सावंत, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. औदुंबर आण्णा पाटील यांचे नातु मोहन पाटील, माजी संचालक बाळासाहेब पाटील.
पंढरपूर: दरवर्षी 10 कोटींचा फायदा होतो असे सांगणारे सभासदांची दिशाभूल करून पुन्हा एकदा कारखान्याला आर्थिक संकटात टाकण्यासाठी खोटी माहिती देत आहेत. मी कारखान्याच्या अहवालाचा संपूर्ण अभ्यास केला असून अहवालाचा आधार घेतच बोलतोय. पूर्वी अ’ दर्जा असणार्या कारखान्याची श्रेणी आता घसरून ती ब’ दर्जा आणला आहे. प्रस्थापितांनी आता तरी लबाड बोलणे थांबवावे.
कारखान्याची प्रगती झाली आहे असे ते म्हणतात. तर हा घ्या पुरावा’ असे म्हणत श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रमुख डॉ. रोंगे यांनी अहवालातून कारखान्याला अधोगती कशी प्राप्त झाली हे स्पष्ट करीत होते. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रमुख डॉ. बी. पी. रोंगे यांनी शामीयाना हॉटेलमध्ये आयोजिलेल्या पत्रकार परिशदेत अहवालाचा आधार घेत सत्ताधारी किती लबाड बोलून सभासदांची दिशाभूल करतात हे सांगत होते. यावेळी त्यांचे समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक भोसले, कारखान्याचे विद्यमान संचालक, राजाराम सावंत, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. औदुंबर आण्णा पाटील यांचे नातु मोहन पाटील, माजी संचालक बाळासाहेब पाटील व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महावीर देशमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. रोंगे म्हणाले, उस तोडणी मजुरांना अॅडव्हान्स म्हणून दिलेले 15 कोटी 95 लाख रूपये अद्याप वसूल झाले नाहीत. यावर ऑडीटरनी वसूलीसाठी प्रयत्न करावेत असे नमुद केले आहे. तसेच 2012-13 मध्ये अहवालात त्यांच्या उसाचे क्षेत्र व गाळपासाठी दिलेला ऊस यात खूप मोठी तफावत जाणवते. यावरून ते पट्टीचे शेतकरी कसे? त्याचबरोबर 2014-15 मध्ये गोकूळ दिगंबर जाधव यांचे नोंदलेले उसाचे क्षेत्र 0 एकर आहे आणि ते 32 टन उस गाळपासाठी पाठवितात. आता हा उस कोठुन आला. हा एक संशोधनाचा विषय आहे. असे डॉ. रोंगे यांनी अहवालातूनच स्पष्ट केले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची अहवालाच्या आधारे उत्तरे देवून सुत गिरणी, अर्जुन बँंंक या नेमक्या कुठे आहेत? हे देखील विचारले. वक्तृत्व चांगले करणार्यांनी मोगम न बोलता काहीतरी कागदपत्राचा आधार घ्यावा असेही ते म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या शैक्षणिक विषयावरील प्रश्नांला त्यांनी संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शी चालत असून कोणीही मोगम बोलू नये. अॅडमिशन पासून ते कॉलेजच्या प्रत्येक वर्षीचा निकाल हा सर्वांंना माहितच आहे’ कुलगुरूच्या प्रश्नावर ते म्हणाले, कुलगुरू व्हायचे असेल तर मी सहकार क्षेत्रात उतरलो असतो का? हा तालुका माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. का मला दुसरीकडे पाठवता? असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला.
निवडणूकीनंतर मात्र कारखान्याला तोटा कसा झाला. सभासद असंतुष्ट का आहेत. याच्या खोलात जावे लागणार आहे. यावेळी स्वाभिमानीचे भोसले, संचालक सावंत, आण्णांचे पुतणे पाटील यांनीदेखील आपल्या
विचारांना वाट करून दिली.