पंढरपूर लाईव्ह वृत्त:-
अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान जागा करणा-या, मराठी माणसांची अस्मिता वृद्धींगत करणा-या स्वराज्य संकल्पक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची आज जयंत्ती. त्यांच्या जयंत्ती दिनी त्यांना पंढरी च्या सत्यशोधक युवा प्रतिष्ठान,पंढरपूर यांच्यावतीने मानवंदना आणि अभिवादन करण्यात आले.तसेच आज पंढरी च्या क्रांतिसुर्य तिर्थावर पंचक्रोशीतुन बरीच तरुणाई एकवटली होती.
यामध्ये छावा संघटना,पंढरपूर, संभाजी ब्रिगेड पंढरपूर,वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद पंढरपूर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पंढरपूर आणखी बरेच जन हिथ आले होते.सर्वांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय देवमारे, रमेश देवमारे, अजिंक्य देवमारे, महेश देवमारे, बबलु देवमारे, सुहास माळी,विकास माळी, समाधान बनकर, अमोलराज घोडके,विनायक ( दादा ) चव्हाण आणखी बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.