पंढरपूर दि. 03:- तालुक्यातील ज्या नागरिकांनी आपल्या आधार कार्डसाठी नोंदणी केली नाही त्यांचे आधार कार्डचे काम नियोजनरित्या व जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे कायमस्वरुपी आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती तहसिलदार नागेश पाटील यांनी दिली.
शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. निवडणूक ओळखपत्रास आधार कार्ड जोडणे, मनरेगा अंतर्गत मजुरांचे आधार कार्ड जोडणे, विविध सामाजिक योजनेच्या लाभार्थीचे आधार कार्ड जोडणे, शिधा पत्रिका धारक व इतर सर्व प्रकारच्या शासकीय लाभार्थी, विद्यार्थी यांचे आधार कार्ड नोंदणी असणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचना व मार्गदर्शनानूसार तहसिल कार्यालय पंढरपूर येथे हे नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. आधार नोंदणी केंद्र शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत सुरु राहणार आहे. या खेरीज तालुक्यातील पुळूज, भोसे, भंडिशेगाव, तारापूर, नांदोरे या गावातील महा ई सेवा केंद्रात आधार नोंदणी केंद्र चालू आहे.
आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी पुरावा म्हणून छायाचित्र असणारे ओळखपत्र (मतदान कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, शासकीय कर्मचारी असल्याचे ओळखपत्र, शाळा महाविद्यालयाचे ओळखपत्र यापैकी एक) व रहिवासी दाखला (मिळकत ऊतारा, विज बील, दूरध्वनी बील व छायाचित्र असणारा रहिवासी दाखला यापैकी एक) असणे आवश्यक आहे. आधार नोंदणी निशूल्क असून याचा तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहनही तहसिलदार श्री पाटील यांनी केले आहे.
००००
सर्व ताज्या घडामोडी, मनोरंजन व विविध माहितीसाठी बघत रहा…
जगभरातील लाखो मराठी माणसांनी पसंत केलेले एकमेव ई-न्युज वेब पोर्टल व अॅन्ड्रॉईड अॅप
‘पंढरपूर लाईव्ह’
लॉग इन करा
www.pandharpurlive.com
अधिक माहितीसाठी आमचा व्हाटसअप क्र.
8552823399
जगभरातील लाखो मराठी माणसांनी पसंत केलेले एकमेव ई-न्युज वेब पोर्टल व अॅन्ड्रॉईड अॅप
‘पंढरपूर लाईव्ह’
लॉग इन करा
www.pandharpurlive.com
अधिक माहितीसाठी आमचा व्हाटसअप क्र.
8552823399

