मुंबई : बेस्टला तोट्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी भविष्यात विशेष योजना राबण्यात येणार आहेत. याचा एक भाग म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या बस लवकरच मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहेत.
केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने नवा प्रकल्प सुरु केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 ते 20 बसेस देण्यात येणार आहेत. त्यानंतर सुमारे 100 बसेसची मागणी केली जाऊ शकते.
बॅटरी बसचा उपयोग कमी अंतरावरच्या ठिकाणी प्रवासी वाहतुकीसाठी केला जाणार आहे. विजेसाठी बेस्ट डेपोवर सोलर युनिट लावले जाणार आहेत. त्याद्वारे बेस्ट प्रशासनाचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल.

