![]()
पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील सांगोला रोडवर आज दि.3 फेब्रुवारी 2016 रोजी दुपारी 2 वाजणेच्या सुमारास अज्ञात वाहनाने पाठीमागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 80 वर्षीय वयोवृध्दाचा करुण अंत झाला आहे.
याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाणेकडून मिळालेल्या माहितीनुसार समजलेले सविस्तर वृत्त असे की, हरी गणपत साळुंखे (रा.पंढरपूर नगरपरिषदेमागे, पंढरपूर) हे 80 वर्षाचे वृध्द दामोदर नगर, सांगोला रोड येथील आपल्या मुलाच्या घराकडून सांगोला रोडने पंढरपूरकडे पायी चालत येत असताना येथील गुलाबबाबा मठासमोर पाठीमागुन आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यानंतर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचेवर उपचार चालु असताना त्यांचा मृत्यु झाला. याबाबतची फिर्याद आबा हरी साळुंखे (30) रा. नगरपरिषदेमागे, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पीएसआय माने हे करीत आहेत.
