पंढरपूरमध्ये संगीत साहित्याचे गोडाऊन फोडून 67 हजारांच्या साहित्याची चोरी… अज्ञात चोरट्यांनी टाळ-मृदंग केले लंपास….

Loading

पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्राची अध्यात्मीक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पंढरीतील एका संगीत साहित्याच्या गोडाऊन चे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी टाळ-मृदंगासह ते बनविण्याचे साहित्य आदी 67 हजारांचा माल लंपास केला आहे.

याबाबतचे पंढरपूर शहर पोलिसांकडून समजलेले सविस्तर वृत्त असे की,  विणे गल्ली, पंढरपूर येथील बाळासाहेब हरिभाऊ पुलीयांचे भजन साहित्य बनविण्याचा व्यवसाय असून त्यांचे येथे एक गोडाऊनही आहे. दि. 28 जानेवारी 2016 ते दि. 3 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 10 वाजणेच्या दरम्यान हे गोडाऊन अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून फोडले. व गोडाऊन मधील 70 नग सागळ (पखवाज बनविण्याचे कातडे), 30 नग ढोलकीचे शाई पान, 100 नग पखवाजाची शाई पुडी, 15 नग टाळ तर तयार झालेले 4 15 नग पखवाज (मृदंग) व 4 नग पितळी टाळ असे एकुण तब्बल 67 हजार रुपयांचे संगीत साहित्य चोरुन नेले असल्याची फिर्याद बाळासाहेब हरीभाऊ पुली यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पीएसआय देशमुख हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *