![]()
पंढरपूर तहसिल कार्यालयात 1910 पासुनच्या जुन्या जीर्ण झालेल्या महत्वाच्या नोंदी असणार्या कागदपत्रांचे स्कॅनींग चालु असून यामध्ये जुने सात बारा, जुने फेरफार, 8 अ, क.ड.ई. पत्रक, ईनामपत्रक,जन्म-मृत्यु रजिस्टर आदी महत्वाच्या कागदपत्रांचे कॉम्प्युटराईज्ड स्कॅनींग करणेचे काम चालु असून हे काम अतिशय महत्वपुर्ण आहे. यामुळे नागरिकांना आपल्या कागदपत्रांची व त्यावरील नोंदींची माहिती मिळणेची कामे तत्परतेने व पारदर्शकतेने होतील.
कार्यालयात असणारे अ दर्जाचे जुने 7/12 एकुण 3045 नोंदवह्या/पुस्तकांमधील एकुण 456750 पानांचे स्कॅनींग, अ दर्जाच्या जुन्या फेरफाराच्या 6570 नोंदवह्या/पुस्तकांमधील एकुण 328500 पानांचे स्कॅनींग, अ दर्जाच्या क.ड.ई. पत्रकांच्या 240 नोंदवह्या/पुस्तकांमधील एकुण 24000 पानांचे स्कॅनींग, अ दर्जाच्या इनामपत्रकांच्या 60 नोंदवह्या/पुस्तकांच्या एकूण 600 पानांचे स्कॅनींग, जन्म-मृत्यु रजिस्टरच्या 4060 नोंदवही/पुस्तकांमधील एकुण 60900 पानांचे स्कॅनींग करणेचे कार्य 15 ऑक्टोबर 2015 पासुन चालु झाले आहे. 2 मशिन्स् च्या माध्यमातून हे काम चालु असून मर्यादीत कालावधीमध्ये हे काम पुर्ण करण्यासाठी आणखी मशिन्स् व कर्मचारी वाढविण्यात येतील या कामाचे कॉन्ट्रॅक्ट हैद्राबाद येथील एका खाजगी कंपनीला जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. दररोज दोन ते तीन हजार कागदपत्रांचे स्कॅनींग होत आहे. एकुण 13995 नोंदवह्या/पुस्तकांमधील एकुण 870750 पानांचे स्कॅनींग करावयाचे काम चालु असून लवकरच ही सर्व कागदपत्रे नागरिकांना नव्या स्वरुपात मिळतील अशी माहिती नायब तहसिलदार सीमा सोनवणे यांनी दिली आहे.

