![]()
महाराष्ट्राचे जलसंपदा, जलसंधारण व संसदिय कार्य, राज्यमंत्री मान.ना.श्री.विजयजी शिवतारे साहेब यांनी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पंढरपूर बँकेचे प्रशासकीय कार्यालयास भेट दिली. यावेळी बँकेचे कुटुंबप्रमुख मा.श्री.सुधाकरपंत परिचारक व चेअरमन श्री.प्रशांत परिचारक यांनी मा.ना.श्री.विजयजी शिवतारे तसेच मा.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांचा श्री पांडुरंग प्रतिमा, शाल, श्रीफळ देवून यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, साईनाथभाऊ अभंगराव, डॉ.बी.पी.रोंगे, संभाजी शिंदे, जनसेवा जिल्हा उपाध्यक्ष राहूल पाटील, महावीर देशमुख, अभिराज शिंदे, युवा सेना संपर्क प्रमुख अतुल राजूरकर
आदी शिवसेनेचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बँकेचे व्हा.चेअरमन, दिपक शेटे, मुन्नागिर गोसावी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उमेश विरधे आदी मान्यवर उपस्थित होते. पंढरपूर अर्बन बँकेचे कामकाजाविषयी माहिती घेवून श्री.शिवतारे यांनी जिल्ह्यातील सहकार खातेचे बँक, कारखाने आदी सहकारी संस्थाच्या आर्थिक स्थिती बाबत चर्चा केली व जिल्ह्यातील जलसंधारणाबाबत आमदार प्रशांत परिचारक यांचेशी सखोल चर्चा केली.
यावेळी राज्यमंत्री श्री.शिवतारे म्हणाले, ‘पंढरपूरात श्री रूक्मिणी पांडुरंगाचे दर्शनामुळे येथे येण्याचा योग
आला. परिचारक कुटूंबियांची प्रत्यक्ष भेट व परिचय झाला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत अतिशय प्रभावीपणे
सहकार, शिक्षण क्षेत्रात काम करणारे पाठीमागील पिढीतील सुधाकरपंत परिचारक साहेब यांचा पारदर्शक व
सेवाभावी कामकाज सेवा समाजाच्या उन्नतीसाठी दिली, एकदंरीत पुर्ण आयुष्य समर्पित पध्दतीने जगत तसेच संस्कार पुढच्या पिढला दिल्याचे आमदार प्रशांतरावांना भेटल्यावर जाणविले.’
‘नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत संपूर्ण परिचारक कुटूंबावर सोलापूर जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी संपूर्ण विश्वास दाखवित राजकीय अभिनिदेशाच्या पलिकडे जाऊन विधानपरिषदेवर
त्यांना पाठविले.’ अशा भावना व्यक्त करून आमदार प्रशांत परिचारक यांच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
