श्री विठ्ठल अभियांत्रिकीत क्रिडा सप्ताह ‘ग्लान्स 2016’ उत्साहात सुरु

Loading

पंढरपूर:-
विद्यार्थ्यांच्या कला व क्रिडा गुणांना वाव देण्यासाठी यंदा देखील क्रिडा सप्ताहास सुरुवात करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा व संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. या क्रिडा सप्ताहाच्या स्पर्धेत क्रिकेट, खो-खो, बास्केट बॉल, बॅडमिंटन, कबड्डी अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाकरीता अपुरा वेळ मिळत असल्यामुळे क्रिकेटचे सामने हे दिवसरात्र ठेवले आहेत.

       श्री विठ्ठल अभियांत्रिकीचे नेहमीच खेळात योगदान राहीले आहेे. सन 2015-16 मध्ये झालेल्या विद्यापीठ अंतर्गत सामन्यांमध्ये बॉक्सींग स्पर्धेंमध्ये 56 ते 60 वजन गटात रमेश वैजिनाथ जगदाळे व 45 ते 48 वजन गटात प्रियंका बाबू ऐवळे यांनी उपविजेता पद पटकाविला होता. तसेच निलेश व्यंकटेश पवार व दिंगबर संभाजी लोंढे यांची निवड विद्यापीठाच्या मल्लखांब संघात झाली. त्यानी पतियाळा (पंजाब) येथे झालेल्या आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धेमध्ये सोलापूर विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले आहे. भाग्येश विरभद्र मुळगे यांचा धर्नुविद्या स्पर्धेत तृतिय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्र्थ्यांना क्रिडा विभाग प्रमुख प्रा. एस.एल. उत्पात यांचे मागदर्शन लाभले आहे.क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी काशिनाथ लवटे, डिप्लोमा पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए.डी. इंगळे, अधिठाता डॉ.एस.एल.मुकणे, अधिठाता प्रा.एस.आर. गवळी, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम. पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
छायाचित्र:-श्री विठ्ठल अभियांत्रिकीत क्रिडा सप्ताहास सुरुवात झाली असून त्याचे संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा व संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी क्रिडा विभाग प्रमुख प्रा. एस.एल. उत्पात व काशिनाथ लवटे स्पर्धक व आदी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *