![]()
पंढरपूर, दि. 12 :– नागरी हक्क संरक्षण अंतर्गत प्रचार व प्रसार या योजनेअंतर्गत अस्पृश्यता निर्मूलनार्थ पंढरपूर तालूक्यातील सोनके (मारुती मंदीर) येथे ग्रामपंचायत स्तरावर दिनांक 16 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता एक दिवशीय शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे यांनी दिली.
सोनके ग्रामपंचायत येथे आयोजित केलेल्या या शिबीरात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतीबंधक कायदा 2015, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, अनुसूचित जातीसाठी (विघयो) अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, कायदे विषयक माहिती व महिलांचे हक्क आणि कायदे तसेच जातीय निर्मूलन या विषयावर प्रबोधन करण्यात येणार आहे.
या शिबीरामध्ये विधिज्ञ मार्गदर्शन करणार असून शिबीरास जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पंढरपूर उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, विविध गावचे ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे, तरी या शिबीराचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा असे आवाहनही श्री. घुगे यांनी केले आहे.
