जनकल्याण मुळे पंढरीच्या आरोग्यसेवेत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध. जयमालाताई गायकवाड

Loading

पंढरपूर( प्रतिनिधी)

 दि.13 पंढरपूर शहर व परिसरातील क्रिटीकल आजाराच्या रुग्णांसाठी जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्ममातून तातडीने अत्याधुनिक वैद्यकीय सेवेची गरज परिपुर्ण होवून जनकल्याण हॉस्पिटलने पंढरीच्या आरोग्यसेवेत मोलाची भर घातली आहे असे प्रतिपादन जि.प.अध्मक्षा सौ.जयमालाताई गायकवाड यांनी केले.सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त वसंतदादा काळे मेडीकल फाऊं डेशन भंडीशेगांव च्यावतीने जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर येथे आयोजित केलेल्या मोङ्गत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबीराचे उदघाटन प्रसंगी गायकवाड बोलत होत्या राजकीय,सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करीत असताना अनेक हॉस्पिटलला रुग्णांसंदर्भात भेटी देण्याचा योग आला. जनकल्याण हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो गरीब रग्णांवर मोङ्गत उपचार करणेत आले. अत्यंत गंभीर रुग्णांवर कमी दरामध्ये उच्चतम दर्जाची सेवा देवून, विविध प्रकारची  अवघड ऑपरेशन करून अनेकांना जीवदान मिळालेले आहे असे ही सौ.गायकवाड यांनी सांगीतले. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी अध्यक्षपदावरून बोलताना कल्याणराव काळे यांनी राजकारण व समाजकारणा बरोबर आरोग्य क्षेत्रातही आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे याचे कौतूक यावेळी त्यांनी केले.  यावेळी स.शि.वसंतराव काळे सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे , दि.मर्चंट बँकेचे चेअरमन युवराज पाटील,  सौ.संगिता काळे, नगरपालिका आरोग्य समिती सभापती सौ.मनिषा कोताळकर, नगरसेवक लक्ष्मण शिरसट, सिव्हिल सर्जन डॉ.मल्लिकार्जुन पटटणशेटटी, तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ.एकनाथ बोधले,डॉ.भाकरे, डॉ.केचे, डॉ.कुलकर्णी,कॅन्सर तज्ञ डॉ.पराग कुमठेकर, हदय रोग तज्ञ डॉ.रिझवान हक, डॉ.गायकवाड,एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे येथील डॉ.शिंदे, गणेश ठिगळे, नारायण दादा मोरे, महादेव देठे, नागेश ङ्गाटे,राजाभाउ माने, हणमंत सुरवसे, अ‍ॅड.राजेश भुदले, बापू घंटी, शकूर बागवान, सौ.डॉ.जयश्री शिनगारे, डॉ.विनायक राऊ त, डॉ.आनंद गायकवाड , सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.कारखान्याचे आजी माजी संचालक व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.  सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त फेब्रुवारी महिन्यामध्ये महिनाभर अखंड हरिनाम सप्ताह , पुरस्कार वितरण सोहळा, वसंत केसरी कुस्ती स्पर्धा, रक्तदान शिबीर, वक्तृत्व स्पर्धा, सामुदायिक विवाह सोहळा, लावणी महोत्सव इ.सामाजिक उपक्रमांचे अयोजन केले जाते असे कल्याणराव काळे मांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ.सुधीर शिनगारे यांनी जनकल्याण हॉस्पिटलच्या कार्याची माहिती देवून वर्षभरात झालेल्या आरोग्य क्षेत्रातील कामाचा आढावा देत स्व.वसंतदादा काळे यांच्या आठवणींना उजाळा दिला तर आभार डॉ.अनिल काळे मांनी मानले हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, स्टाङ्ग, व्मवस्थापक भारत शिंदे मांनी परिश्रम घेतले.  

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *