आजच्या काळात रोबोट हा वेगवेगळया क्षेत्रात वेगवेगळया कामांसाठी वापरला जात आहे.यामुळे या रोबोटला आता खूप महत्व प्राप्त झाले आहे. ब्लुटुथ रोबोट तयार करण्यासाठी रोबोसेपियन या आंतरराट्रीय कंपनीचे रिसर्च इंजिनिअर दिपकराज सिंह यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. या एकदिवशीय कार्यशाळेमुळे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अद्यावत व नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान प्राप्त झाले. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: रोबोट बनविले व स्वत: प्रोग्रम तयार करुन उपस्थितांसमोर रोबोट चालवून दाखविले. दुसर्या दिवशी त्या विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रोग्राम करुन रोबोट चालविण्याची स्पर्धा पार पडली.यामध्ये विजय झालेल्या पहीला गट विशाल माने, लखन घोडके, समर्थ देवमारे, अक्षय मेटकरी,दुसरा गट मनजीत शिंदे, अक्षय लऊळकर, सुदर्शन बर्डे, काळू सरतापे, तिसरा गट किरण पाटील ओंकार क्षीरसागर, वृशाली कुंभार, व मयुरी कांबळे या तीन संघांना आय.आय.टी. दिल्ली येथे होणार्या ‘रोबोटीक्स 2016’ या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेचे उत्कृट आयोजन केले होते. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. पी.एस. कचरे, समन्वयक प्रा. डी.एस. गायकवाड, मेसाचे समन्वयक प्रा. बिभीाण दुपडे, मेसाचे विद्यार्थी अध्यक्ष अजिक्य देशमुख, सुहास बागल, निलेश हारगुडे यांनी मोलाचे योगदान दिले.
छायाचित्र:-श्री विठ्ठल अभियांत्रिकीत ‘ब्लुटुथ रोबोटीक्स’ ही आंतरराट्रीय कार्यशाळा व स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. विजेते स्पर्धकांसोबत प्र.प्राचार्य प्रा.एन.डी.मिसाळ,मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. पी.एस. कचरे, समन्वयक प्रा. डी.एस. गायकवाड, अधिठाता डॉ.प्रशांत पवार, अधिठाता प्रा.एस.आर. गवळी व आदी.