
पंढरपूर :
शतकोत्तवर वाटचाल करीत असलेली सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणार्या दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरच्या स्वीकृत तज्ञ संचालक पदी बँकेचे यापुर्वीचे तज्ञ संचालक सीए श्री.राजेंद्र विलास बजाज यांची पुनश्च निवड झाली. तसेच सहकार क्षेत्रात कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास असणारे अॅड.प्रकाश उर्फ भालचंद्र नामदेव कुलकर्णी यांची तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करणेत आली.
याप्रसंगी बँकेचे कुटूंबप्रमुख मा.श्री.सुधाकरपंत परिचारक व बँकेचे चेअरमन आमदार मा.श्री.प्रशांतराव परिचारक, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.97 व्या घटनादुरूस्तीचे अनुषंगाने पोटनियमास आधीन राहून क्रियाशील सभासदांपैंकी स्वीकृत दोन तज्ञ संचालक निवडणे आवश्यक असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उमेश विरधे यांनी दिली. सीए बजाज व अॅड.कुलकर्णी यांचा सत्कार बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे वतीने यावेळी करणेत आला.
