सुरत
– विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय महासचिव प्रवीण तोगडिया
यांच्या चुलत भावासह तिघांची शनिवारी सुरतमध्ये हत्या करण्यात आली आहे.

सूत्रांनी
दिलेल्या माहितीनुसार, सुरतमधील वराछा भागात प्रवीण तोगडिया यांचे चुलत
भाऊ भरत तोगडिया यांच्यासह तिघांची शनिवारी रात्री आठच्या सुमारास चाकूने
भोसकून हत्या करण्यात आली. या तिघांचे मृतदेह भरत तोगडियांच्या मित्राच्या
कार्यालयाच्या परिसरातच मिळाले. वराछा भागात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात
आली आहे. अनेक संघटनांकडून या हत्याकांडाबद्दल निषेध व्यक्त करण्यात येत
आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

या
प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात
येत आहे. भरत तोगडिया यांचे सख्खे भाऊ प्रफुल्ल तोगडिया हे सुरत महापालिकेत
विरोधी पक्षनेते आहेत.