मुंबई, दि. १५ : कोंचिंग क्लास्सेस जर नीटच्या तयारीसाठी पैसे मागत असतील
तर त्यांच्यावर करवाई करा. त्यांचे परवाने रद्द करा असे आव्हान नितेश राणे
यांनी केले आहे. यासंबधीत त्यांनी तातडीची पत्रकार परिषेदेत आयोजित केली
आहे. त्यांनी हा माहीती आपल्या ट्विटरवरुन दिली. राज ठाकरे, मुख्यमंत्री
यांनी न्यायालयाच्या निर्णायावर नारीजी व्यक्त केल्यानंतर या यादीत आता
नितेश राणे यांची भर पडली आहे. नितेश यांनी त्यांच्या पुढील ट्विटमध्ये
सरकार आणि विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. नीट परीक्षेच्या
अभ्यासाच्या तानतनावामुळे विद्यार्थांच्या आत्महत्या झाल्यास सरकार आणि
तावड़े यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा असे त्यांनी आव्हान केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २४ जुलै रोजी ह्यनीटह्ण परीक्षा
घ्यावीच लागली, तर परीक्षेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार १९ मेपासून
विद्यार्थ्यांना धडे देण्याची तयारी करत आहे. त्यासाठी टी.व्ही. आणि
इंटरनेटचे माध्यम वापरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद
तावडे यांनी शनिवारी दिली होती.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा आपण आदर करतो. नीट विद्यार्थ्यांसाठी
अन्यायकारक आहे. नीटच्या निर्णयामुळे संपूर्ण पिढीच्या भविष्याचे नुकसान
होण्याचा धोका आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी
सर्वोच्च न्यायालयाने “नीट”बाबत दिलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली
आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा,
असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.