लहानपनच बर आहे रे देवा..!

             

 देवा मी आज लहान असलो असत तर खरच खुप चांगल झालं असतं रे.आरे देवा निदान मला ती दिल्लीची निर्भया आणि कोपर्डीची छकुली माझी बहिनच वाटली असती ना रे देवा. आजही मला एक प्रश्न पडतो सारेच करतात तुझा हेवा. मग एकदा तरी गदागदा हालव कि रे हि निद्रावस्थेतील न्यायदेवता. का रे देवा तुला कधी हे प्रश्न पडलेत का रे देवा.

               अन्यायाने खचुन जाणारी जनता आणि अन्याय करणारी विद्रुप मानसिकता, यांना आता बांद घालावा की नाही ?  का आजुन अशा निर्भया बळी पडल्या पाहिजेत ? का पुन्हा कोपर्डी प्रकरण झाल पाहिजे ? का पुन्हा एकदा एका कोवळया जिवाला यातना सहन कराव्या लागणार आहेत ? आरे देवा असे सारे प्रश्न पडण्यापेक्षा हि न्यायव्यवस्था जरा कठोर आणि जलद का करत नाही तु ? 
               आता तु म्हणचील आरे मी काय करणार ? आरे देवा आता इथल्या माणसातच माणुसकी उरली नाही. एक घटणा सरते ना सरते तोपर्यंत आणखी एक निरापराध निर्भया बळी पडते. माणसात हायवान म्हणजे एक राक्षच निर्माण झाला आहे.हे राक्षस आपली इच्छावासना पुर्ण करण्यासाठी कोवळया कोवळया निर्भयांना आपले भक्ष बनवत आहेत आणि तु मात्र हे सार निमुटपणे सहन करतोय. आताही तुला वाटतय ना रे देवा तु काय करु शकतो ?
              मलाही माहिती आहे रे तु काहिच करु शकत नाही. कारण तु कालही नव्हता, तु आजही नाही आणि तु उदयाही नसणार. पन आता मला माझ्या कृतीने आणि विचाराने लहान न राहता मोठ व्हाव लागणार हे तुला मान्यच कराव लागणार. कारण मला आता माझ्या या पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा अस माणसुकीला लांछन लावणार कृत्य घडु दयायचे नाही.पुन्हा एखादया छकुलीला बळी पडु दयायचे नाही.यासाठी मी आता खरच एक लढा उभा करणार आहे तो लढा म्हणजे माणसाला माणुसकी आणि माणसात माणुस निर्माण करण्याचा हा माझा लढा असणार आहे.
               आता फक्त एक कर रे देवा निदान तुला न्याय देता येत नसेल तर माझ्यासारख्याला लढण्याचे बळ दे आणि कोपर्डीच्या त्या छकुलीसारखी मला एक छकुली दे.अन्याय सहन करण्यासाठी नाही तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि रणरागीणी म्हणुन अशा षंड प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी. मग बघ पुन्हा कधी अस कृत्य करण्याची मानसिकता निर्माण होणार नाही आणि अस कोणी धाडस करणार नाही.चल रे देवा आज खुप बोललो तुला कारण माणुसच राहिला नाही माणुसकी दाखवायला आणि तुझ्यासारख ऎकुन घ्यायला.म्हणुनच जरा रागात बोललो तुला. राग आला तरी येऊ दे कारण तुला बोलतोय अस समजुन निदान हे वाचुनतरी दोन तीनजन लढा निर्माण करतील. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *