पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे पहाटे एका घरात घुसलेल्या चार चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून सोन्याचे दागिणेंसह एकुण 1 लाख 18 हजाराची जबरी चोरी करुन पोबारा केल्याची घटना घडली आहे.
पंढरपूर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आढीव येथील फिर्यादी मोनाली सुभाष महाडीक यांचे घरी दि. 18 जुलै रोजी पहाटे 1:35 वाजणेच्या सुमारास चार अनोळखी चोरटे शिरले व घरातील लोकांना चाकुचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कमेसह सह एकुण 1 लाख 18 हजार रुपयांची चोरी करुन चोरट्यांनी पोबारा केला.
या गुन्ह्याची नोंद तालुका पोलिस ठाणेत झालेली असून अधिक तपास पीएसआय धोत्रे हे करीत आहेत.