नांगरे-पाटलाचे व्यक्तीमत्व प्रेरणादायी: जिल्हा पोलीस अधिक्षक मनिषा दूबूले

विठ्ठल प्रशालेत मन मे है विश्‍वास चरित्रग्रंथाचे वितरण विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मन मे है विश्‍वास या पुस्तकाचे विठ्ठल प्रशाला ( गुरसाळे ) येथे वितरण करताना मनिषा दुबूले, मानसिंग चव्हाण, आर.डी. पवार, रामभाऊ गायकवाड आदी  

पंढरपूर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांचे व्यक्तीमत्व प्रेरणादायी असून त्यांचे चरित्र मन मे है विश्‍वास वाचून आणखी नवे नांगरे -पाटील ऊभा राहतील असा विश्‍वास अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक मनिषा दुबूले यांनी व्ये केला.

गूरसाळे ( ता.पंढरपूर) येथील विठ्ठल प्रशाला येथे मन मे है विश्‍वास या चरित्र ग्रंथाचे वितरण दुबूले यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ गायकवाड, विठ्ठलचे जनरल मॅनेजर मानसिंग चव्हाण यांच्यासह प्रशालेचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना दूबूले म्हणाल्या की, नांगरे-पाटील यांनी ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थीतीत शिक्षण घेऊन पोलीस दलात
उल्लेखनीय कार्य केलेले आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी त्यांनी दाखवलेले धैर्य अतूलनीय असून त्यांनी लिहीलेल्या मन मे है विश्‍वास या पुस्तकामुळे युवकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे भविष्यात आणखी नवीन नांगरे-पाटील उदयास येतील.

सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगीतले की, आपल्या जिल्ह्यातून नांगरे-पाटील यांच्यासारखे काही युवक तयार व्हावेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नांगरे-पाटील यांच्या मन मे है विश्‍वास या 1000 पुस्तकाचे जिल्ह्यातील महत्वाच्या शाळा, महाविद्यालयातून वितरण करणार आहे.

प्रशालेचे प्राचार्य आर.डी. पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *