पंढरपूर, दि. ३० (प्रतिनिधी) – रुक्मिणी पांडुरंग पवार ( वय ८४, रा.मनीषानगर ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. पंढरपूरच्या रिमांड होममध्ये त्यांनी वीस वर्षे शालेय विद्यार्थ्यांची सेवा केली. शनिवार दि. ३० जुलै रोजी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. दत्ता पवार यांच्या त्या मातोश्री होत.
Posted inPandharpur

