मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास विधान परिषदेत वंदे मातरम् ने सुरवात

मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास विधान परिषदेत वंदे मातरम् ने सुरवात झाली.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विधानपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.
००००००
विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय
            मुंबई, दि. 6 : विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहाला करुन दिला. यामध्ये गृह राज्यमंत्री रणजीत पाटील, विधानपरिषद सदस्य सर्वश्री विक्रम काळे, नागो गाणार, बाळाराम पाटीलयांचा समावेश आहे.
००००००
विधान परिषद तालिका सभापतींची नावे जाहीर
मुंबईदि. 6 : आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान परिषदेच्या तालिका सभापतींची नावे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केली.
सदस्य श्रीमती नीलम गोऱ्हेसदस्य सर्वश्री जनार्दन चांदूरकरअपूर्व हिरेकिरण पावसकर यांची नावे तालिका सभापती म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *