![]()
सोलापूर दि. 06 : प्रलंबित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून त्वरीत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा लोकशाही दिना संदर्भात बैठक घेण्यात आली त्यावेळी जिल्हाधिका-यांनी संबधित यंत्रणाच्या प्रमुखांना सूचना केल्या.
मागील जिल्हा लोकशाही दिन व त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांमधून एकूण 05 टोकन अर्ज संबंधित कार्यालयांकडे पाठविण्यात आले होते. सदर प्रकरणांची आज सुनावणी घेण्यात येवून प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आज रोजी एकूण 64 अर्ज प्राप्त झाले असून त्यांची छाननी करुन संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाही साठी पाठविण्यात येत आहेत.
दिनांक 02 जानेवारी 2017 रोजी लोकशाही दिनामध्ये व त्यानंतर टोकन अर्जासाठी पात्र न ठरलेल्या उदा. न्यायालयीन प्रकरणे,आस्थापना विषयक प्रकरणे, व्यक्तीगत स्वरुपाच्या नसलेल्या तक्रारी इ.असे एकूण 123 प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यानुसार सदरची प्रकरणे आवश्यक त्या कार्यवाहीकरीता संबंधित विभागांकडे पाठविण्यात लाली आहेत. व ही प्रकरणे 7 दिवसांच्या आज निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
