मुंबई, दि. 6 : माजी विधानसभा सदस्य जांबुवंतराव बापुरावजी धोटे, ॲड. चंद्रकांत मोहनलाल छाजेड, आनंदराव कोंडिबा देसाई, पुंजाजी बापुजी कडू- पाटील, माणिकराव उर्फ रावसाहेब रामचंद्र आपोतीकर, वामनराव उर्फ बाबासाहेब बाजीराव भोकरे, बाबुसिंग दगडूसिंग राठोड, चंद्रशेखर धोंडिबा भोसले या विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज विधानसभेत शोकप्रस्तावाद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव देशमुख, अमित देशमुख, जीवा पांडू गावित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
