राष्ट्रीयकृत बँकाकडून ग्राहकांना वेळेत सेवा मिळावी : पाटोळे
सोलापूर दि. 06:- जिल्हयातील राष्ट्रीयकृत बँकाकडून ग्राहकांना योग्यप्रकारे सेवा देण्यात यावी, अशा सूचना अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी आज दिल्या.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, तहसिलदार रमा जोशी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीयकृत बँकांकडून ग्रामीण भागात वेळेवर सेवा मिळत नाही त्याचबरोबर धनादेश वटले जात नाहीत, असे अशासकीय सदस्यांनी बैठकीत मांडले. त्यावर या सेवा सुरळीत होतील आणि ग्राहकांना वेळेत सेवा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे श्री.पाटोळे यांनी बँक प्रतिनिधींना सांगितले.
त्याचबरोबर या बैठकीत एस.टी.सेवा आणि वीज पुरवठयासंदर्भांतील विषयावर चर्चा झाली. सोलापूर शहरात काही ठिकाणी अयोग्य पध्दतीने स्पीडब्रेकर उभारण्यात आलेले आहेत. त्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली. यावर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र अमृतकर यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
बैठकीत 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याबाबतही चर्चा झाली.यावेळी पी.व्ही.कुलकर्णी,शशीकांत हरदास,श्रीकांत बावीसकर,दिपक इरकल,शोभा सागर,भालचंद्र पाठक,डॉ.माधवी रायते, आनंद सागर, सिध्दराम झालवडे, राजशेखर अलगीकर आदी सदस्य उपस्थित होते.
