माजी नगरसेवक अशोक डोंबेंच्या यांच्या वाढदिनानिमित्त शालेय साहित्याची तूला … 

Loading

माजी नगरसेवक अशोक डोंबेंच्या यांच्या वाढदिनानिमित्त शालेय साहित्याची तूला … 

पंढरपूर, दि. ४ (प्रतिनिधी)  माजी नगरसेवक अशोक बाळासाहेब डोंबे यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्त साधून त्यांचा भव्य नागरी सत्कार आणि शालेय साहित्याचा  तुलाभार अन त्या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी श्री श्री श्री १०८ श.ब्र. प्रभूदेव शिवाचार्य माढेश्वर महाराज आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित असणार आहेत. 

वाढदिनाच्या निमित्ताने बुधवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना धान्य वाटप, नवजीवन निवासी अपंग शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिष्टान्न भोजन, हनुमान मैदान  येथील निवासी अंधशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सत्कार समारंभ प्रदक्षिणा मार्गावरील पांडुरंग भवन येथे बुधवार दि. ५ एप्रिल रोजी सायं. ६ वाजता संपन्न होणार आहे. या सत्कार सोहळ्यास आप्तइष्टांनी उपस्थित रहावे असे आवाहन आशिष डोंबे व अमित डोंबे मित्र परिवार आणि वीरमर्द अनिलराज गणेशोत्सव तरूण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *