साहित्यीक रवि सोनार व सुदीप शहा यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

साहित्यीक रवि सोनार व सुदीप शहा यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

पंढरपूर 12 एप्रिल
येथील ‘शब्दांकुर साहित्य वर्तुळचे’ अध्यक्ष रवि वसंत सोनार व चि.सुदीप शितल शहा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. येथील नवरंगे बालकाश्रमात साहित्यीक रविराज सोनार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन बालकाश्रमातील मुलांना विविध पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

याच दिवशी येथील सुप्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ. शितल शहा यांचे चिरंजीव सुदीप शहा यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचा व रविराज सोनार यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार सुनील उंबरे, शंकर कदम, डॉ.संजय रणदिवे, भगवान वानखेडे, प्राचार्य शिवाजीराव बागल व कवी सचिन कुलकर्णी आदींनी यावेळी आपली भावना व्यक्त केली. यावेळी नवरंगे बालकाश्रमातील व्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *