![]()
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्षा सुजाता बडवे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक वामन बंदपट्टे, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, नगरसेविका सुप्रिया डांगे, करुणा आंबरे, लतिका डोके, पाणीपुरवठा समिती सभापती विक्रम शिरसट, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, बांधकाम समिती सभापती अक्षय गंगेकर, विवेक परदेशी, सुजीतकुमार सर्वगोड, मालन देवमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना प्रशांतराव परिचारक यांनी भारत देश विविध जाती असलेला देश असुन देशात अनेक धार्मिक स्थित्यंतरे झाली. परंतु महात्मा फुले यांनी समाजातील जातीयता नष्ट करुन सर्व समाज विज्ञाननिष्ठ बनविण्याचे काम केले व देशातील उपेक्षीतांना न्याय मिळाला पाहिजे म्हणुन असुड नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातुन शेतक-यांना न्याय मिळवुन देण्याची भुमिका मांडली. तसेच समाजातील महिलांचे स्थान चुल आणि मुल असे न राहता प्रत्येक घरातील महिला हि सज्ञान व सक्षम झाली पाहिजे म्हणुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातुन महिलांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली व आज त्यांचे विचार आचरणात आणण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे असे सांगुन महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले. यावेळी समाजसेवक सचिन डांगे, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, शंकर देवमारे, नाना वाघमारे, कृष्णा वाघमारे, तुकाराम राऊत, कमलकाकु देवमारे, डी.राज सर्वगोड, रामभाऊ माळी, संतोष पवार, शंकर पवार, धर्मराज घोडके, इब्राहीम बोहरी, भारत माळी, शिवाजी मस्के, अनिल ननवरे, रामेश्वर सातपुते, शिवाजी मेडसिंगकर, मालोजीराजे शेंबडे हे उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत शिवाजी मेडसिंगकर व आभार नगरसेवक अनिल अभंगराव आणि सुत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांनी केले.


