मी लालदिव्याची गाडी वापरणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय मंत्र्यांच्या वाहनांवर लाल दिवा वापरण्यावर निर्बंध घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. केंद्रातील व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या या महत्त्वाच्या पावलाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करीत असून, मीही लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
