पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या हत्येप्रकरणी पाच जण ताब्यात….
पंढरपूर शहरातले तिघे, पंढरपूर तालुक्यातील एक जण व सांगोला शहरातील एकजण पोलिसांच्या ताब्यात!
पंढरपूर Live 18 April
पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भुईटे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर एलसीबी पथकाने पाचजणांना कोल्हापूर मध्ये पकडून सर्वांना मिरज पोलीसांच्या ताब्यात दिलं असल्याची माहिती मिळते.
ताब्यात घेतलेले पाच जण खालीलप्रमाणे आहेत.
राजेंद्र दत्तात्रय भिंगे (३८) रा.उमा नगर, पंढरपूर,
गजेंद्र दिगंबर पवार (३३) रा. नागालँड मागे, पंढरपूर,
रविंद्र हरिभाऊ गुरव (३७), रा.रेल्वे स्टेशन जवळ, गणेश नगर पंढरपूर,
सचिन नारायण मोहिते (२४) रा.धनगर गल्ली, सांगोला,
रावसाहेब संभाजी लोखंडे (२८) रा.भाळवणी, ता.पंढरपूर
गुन्ह्यातील वाहन
पांढ-या रंगाची इंडीका
गाडी क्रमांक MH- 12 QZ 2575 हे सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची मिळते.
