अरबळी येथे नालाबंडींग कामाचा शुभारंभ शैला गोडसे : जास्तीत जास्त पाणी जिरविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत

Loading

अरबळी येथे नालाबंडींग कामाचा शुभारंभ

शैला गोडसे : जास्तीत जास्त पाणी जिरविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत

पंढरपूर : वारंवार भेडसावणाºया भीषण पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नालाबंडींग कामामध्ये जास्तीत जास्त पाणी जिरविण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी जिल्हा परिषद व शासनाकडून वाट्टेल ते सहकार्य करण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी केले.

अरबळी (ता. मोहोळ) येथे कृषी विभाग विशेष घटक योजनेअंतर्गत नाला बंडिंग कामाचा शुभारंभ जि.प. सदस्या शैला गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच चंद्रकांत भुई, उपसरपंच विनायक चोरगे, भारत माने, आबासाहेब जगदाळे, गणेश सोनवणे, गणेश शिवशरण, उत्तम वाघमारे, नामदेव वाघमारे, संजय चोरगे, गणपत मोरे, आण्णा सोनवणे, कृषी पर्यवेक्षक कांबळे, कृषी सहाय्यक एस. एस. कोलाटी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शैला गोडसे यांनी मोहोळ तालुक्यातील काही भाग कायम पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्याचा शेती, सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असून शेतीची पिके, रोजगाराच्या संधी नामशेष होत आहेत. यासाठी भविष्यात याठिकाणच्या शेतकºयांना आपल्या शेतात महत्त्वाची पीके घेण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी पाण्याची गरज आहे. भविष्यात नागरिकांनी दुसºयाला पाणी न मागता शासनाच्या वतीने सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत मिळालेल्या निधीमधून नालाबंडिंग, विहिर पुनर्भरण, बंधाºयातील गाळ काढणे व गावतलावाची खोदाई करणे यासारख्या कामांमध्ये सहभाग नोंदवून भविष्यात जास्तीत जास्त पाणी जीरविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन शैला गोडसे यांनी केले.

यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित करण्यात येत असून भविष्यात स्वत:च्या पाण्याची निर्मिती स्वत:च करावी लागणार आहे. यासाठी ही चळवळ सर्वदूर पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामस्थ, शेतकºयांनी यामध्ये सहभाग नोंदवावा. यासाठी प्रशासकीय पातळीवर सहकार्यासाठी आपण प्रयत्न करू, असे सांगितले.

जलयुक्त शिवार चळवळ गतीमान करू

जलयुक्त शिवार योजना गेल्या काही वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू आहे. मात्र मोहोळ तालुक्यातील काही भाग अद्यापही या चळवळीपासून वंचित आहे. भविष्यात या भागातील जलयुक्त शिवारची चळवळ गतीमान करून जास्तीत जास्त पाणी जिरवून भविष्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकचळवळ उभा करून त्यासाठी स्वत: पुढाकार घेऊ, असे शैला गोडसे यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *