श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी किड्स फाउंडेशन पंढरपूर येथे दिनांक २० व २३ मार्च २०२६ रोजी ग्रॅज्युएशन डे व बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला अशी माहिती प्रशालेच्या प्राचार्या सौ.मानसी मिश्रा यांनी दिली. सौ सुवर्णा वाळके व डॉ. विकास गुरव हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिक प्रदान करण्यात आली.
शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने ॲबॅकस, ऑलिंपियाड अश्या अनेक विविध परीक्षांचे व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षा व स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके यावेळी प्रदान करण्यात आली. यामध्ये ट्रॉफी, सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विविध परीक्षा व स्पर्धा आयोजित करण्यामध्ये अथक परिश्रम घेतलेल्या शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ सुवर्णा वाळके व डॉ. विकास गुरव यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शालेय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचे मनोबल वाढविले. कर्मयोगी पब्लिक स्कूल चे प्राचार्य सिबानारायण दाश यांची ही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, रजिस्ट्रार गणेश वाळके, प्राचार्या सौ.मानसी मिश्रा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

