👁 83,759,249 Views

Breaking : अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल ; मोबाईल ॲपमुळे लाभार्थ्यांना थेट सेवा

Breaking : अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल ; मोबाईल ॲपमुळे लाभार्थ्यांना थेट सेवा

पंढरपूर, दि. २१ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने डिजिटल दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत Annasaheb Patil Mahamandal App हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. या अॅपमुळे लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया थेट मोबाईलवरून करता येणार असून सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होणार आहे.
महामंडळाच्या विविध योजनांसाठी

www.udyog.mahaswayam.gov.in

udyog.mahaswayam.gov.in in Bing

(udyog.mahaswayam.gov.in in Bing) हे संकेतस्थळ कार्यान्वित आहे. मात्र अर्ज प्रक्रियेसाठी संगणक किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत असल्याने लाभार्थ्यांना वेळ व खर्च करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर, ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्रांशी करार करून प्रति सेवा ८५ रुपये दराने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आता पुढील टप्प्यात मोबाईल अॅपची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
हे अॅप Google Play Store वर उपलब्ध असून, नवीन वापरकर्ते मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेलद्वारे OTP पडताळणी करून नोंदणी करू शकतात. पूर्वी नोंदणीकृत लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे थेट लॉगिन करून पुढील प्रक्रिया करता येणार आहे.
महामंडळाच्या योजनांमध्ये LOI, Sanction आणि Claim असे तीन टप्पे असून आवश्यक कागदपत्रे अॅपद्वारे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जाची स्थिती तपासणे, अद्ययावत माहिती मिळवणे आणि पुढील कार्यवाही करणेही शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, क्लेम सादर करणाऱ्या व नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग प्रणालीचा वापर करून गूगल नकाशाच्या सहाय्याने व्यवसाय पाहणीचे नियोजन करण्यात येणार आहे. ही माहिती महामंडळाच्या EHRMS प्रणालीशी जोडण्यात येणार असून पुढील टप्प्यात ही सुविधा अॅपमध्येही उपलब्ध होणार आहे.
मोबाईल अॅपमध्ये संगणक प्रणालीवरील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर अॅप डाउनलोड करून या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे जिल्हा समन्वयक, सौरभ मगर यांनी पत्रकान्वये केले आहे.
00000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *