👁 95,219 Views

कर्मयोगीमधे “कर्माटेक २०२६” तंत्रपरिषदेमध्ये अनेक समाजाभिमुख प्रकल्पांचे सादरीकरण; ज्ञान हेच आयुष्यातील अमूल्य धन : डॉ.मनोज कदम

कर्मयोगीमधे “कर्माटेक २०२६” तंत्रपरिषदेमध्ये अनेक समाजाभिमुख प्रकल्पांचे सादरीकरण; ज्ञान हेच आयुष्यातील अमूल्य धन : डॉ.मनोज कदम

पंढरपूर (प्रतिनिधी): विद्यार्थ्यानी अभियांत्रिकीचे ज्ञान व कल्पकता यांचा वापर करून उद्योजकतेकडे वळले पाहिजे. भावी अभियंते हे नोकरी करणारे न राहता नोकरी देणारे अभियंते तयार व्हावेत व यासाठी कर्मयोगीचे “कर्माटेक २०२६” हे उत्तम व्यासपीठ आहे. कर्माटेक सारख्या स्पर्धेमधून च अनेक नविन शोध जन्माला येतील व अनेक व्यवसाय तयार होतील असा विश्वास छत्रपती संभाजीनगर येथील यशस्वी उद्योजक डॉ.मनोज कदम यांनी व्यक्त केला.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दि. २ एप्रिल २०२६ रोजी आयोजित केलेल्या “कर्माटेक २०२६” या तंत्रपरिषदेमध्ये ते बोलत होते. कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित कणसे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थ्यानी अभियांत्रिकेचे कौशल्य व कल्पकता यावर लक्ष केंद्रीत करून समाजाभिमुख प्रकल्प सकारावेत असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना देऊन महाविद्यालयाची ओळख करून दिली.

“कर्माटेक २०२६” तंत्रपरिषदेचे संयोजक डॉ. अभय उत्पात यांनी प्रस्तावना करून “कर्माटेक २०२६” कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यामध्ये ही कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये असे अनेक उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
कर्माटेक २०२६ तंत्रपरिषदेचे समन्वयक डॉ. एस व्ही एकलारकर यांनी प्रमुख अतिथि डॉ.मनोज कदम यांची ओळख करून देऊन स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


सदर च्या परिषदेमध्ये अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट प्रदर्शन, सर्किट सुडोकू, इलेक्ट्रॉनिक्स क्वीज, रोबो रेस, बेस्ट फ्रॉम वेस्ट, टेक्नो रील्स, कोड फोर्सेस, ब्रिज मोडेल मेकिंग,ग्रीन बिल्डिंग अश्या विविध राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यातील सुमारे ८५० अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.


या कार्यक्रमासाठी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री रोहन परिचारक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी रजीस्ट्रार जी डी वाळके, कर्मयोगी शिक्षण समूहातील विविध महावियालयाचे प्राचार्य, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, माजी विद्यार्थी यशस्वी उद्योजक वैभव पाटील, योग विद्याधाम चे प्राचार्य अशोक ननवरे उपस्थित होते. कर्माटेक २०२६ संयोजक डॉ अभय उत्पात, समन्वयक डॉ. एस व्ही एकलारकर, विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यामागे मोलाचे सहकार्य लाभले. उपप्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *