पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील २६ वर्षीय तरूणाचा म्रुत्यू

पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील २६ वर्षीय तरूणाचा म्रुत्यू

पंढरपूर Live-23/4/2017

पंढरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वास्तव्यास असलेल्या २६ वर्षीय तरुणाचा अज्ञात कारणाने म्रुत्यू झाल्याची नोंद आज शहर पोलिस ठाणेत झाली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, वरील ठिकाणी वास्तव्यास असणारा तरुण राहुल.लक्ष्मण नवत्रे याला पंढरपूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना दि. २३ एप्रील.२०१७ रोजी १२ वाजुन ४५ वाजणेचे सुमारास उपचारापुर्वीच तो मयत झाल्याची खबर  उपजिल्हा रूग्णालयातील सिस्टर उराडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणेत फोनद्वारे दिली आहे.

या घटनेची नोंद शहर पोलिस  ठाणेत झाली असून अधिक तपास पोहेकाँ ननवरे हे करत आहेत.

केवळ २६ वर्षाच्या तरुणाचा झालेला हा करुण अंत पाहून पंढरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात राहणा-या नागरिकांसह सर्वत्र हळहळ व्यक्त. होत आहे.

या तरूणाचा म्रुत्यू नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *