![]()
Pandharpur Live 24 April 2017
सोलापूर, दि. 24 – मोताळा तालुक्यातील शेलगाव बाजार येथील भजनी मंडळ पंढरपूर येथे जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाणगाव फाटयाजवळ सोमवारी पहाटे ट्रक आणि क्रुजरचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्याने 4 जण जागीच ठार झाले. मृतांचा आकड़ा वाढण्याची शक्यता आहे.
मोताळा व् बुलडाणा तालुक्यातून 125 वाहनातून भजनी मंडळ पंढरपुरला जात होते. त्यापैकीच एका गाडीला अपघात झाला आहे. मृतकांमध्ये शेलगाव बाजार येथील दिनेश खर्चे (55), जया चोपडे ( 50), पदमाकर खर्चे (40) तसेच दाताळा येथील अक्षदा संजय चौधरी (17) हे ठार झाले.

