शेतकºयांच्या भावनांचा आदर करा शैला गोडसे : उपोषणकर्त्यांची घेतली भेट, अन्यथा आंदोलन तीव्र करू

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलमध्ये सुरू असलेल्या शेतकºयांच्या उपोषणाला पाठींबा असल्याचे पत्र देताना जि.प. सदस्या शैला गोडसे, प्रभाकर देशमुख व शेतकरी.
पंढरपूर : मागील दहा दिवसांपासून आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलमध्ये शेतकºयांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. तरीही प्रशासन त्याकडे गांभीर्याने पहात नाही, ते पूर्ण चुकीचे आहे. शेतकºयांच्या भावनांचा आदर शासनाने केला पाहिजे, अन्यथा भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन करून प्रशासनाला ताळ्यावर आणू, असा इशारा कुरूल जि.प. गटाच्या सदस्या शैला गोडसे यांनी दिला आहे.
आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलवर जनहित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कॅनॉलमध्येच आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणकर्त्यांचे शैला गोडसे यांनी सोमवारी भेट घेऊन दिवसभर त्यांच्यासोबत बसून त्यांच्या आंदोलनाला त्यांचा पूर्ण पाठींबा असल्याचे जाहीर केले.
उपोषणास बसलेल्या शेतकºयांनी आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी जमिनी गेलेल्या शेतकºयांना त्वरीत मोबदला मिळावा, उपसा सिंचन योजनेची अपूर्ण कॅनॉलची कामे पूर्ण व्हावीत, कॅनॉलला उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडावे, यासह अन्य विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून कॅनॉलमध्ये उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्या काही शेतकºयांची प्रकृतीही खालावली आहे. मात्र तरीही प्रशासन बघ्याची भूमिका घेत शेतकºयांच्या भावनांची थट्टा करीत आहे, हे लोकशाहीला धरून नाही.
शेतकरी आपल्या मागण्या लोकशाही पद्धतीने मांडत असताना शासनानेही त्यांच्या भावनांचा आदर करीत त्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. अन्यथा याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. भविष्यात त्यांच्या मागण्यांचा विचार न झाल्यास यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा सामना शेतकºयांना करावा लागेल, असा इशाराही शैला गोडसे यांनी दिला.
यावेळी जि.प. सदस्या शैला गोडसे, प्रभाकर देशमुख, उपोषणकर्ते शेतकरी व कुरूल जि.प. गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *