एसटी बस ची दुचाकीला धडक.. अपघातात वाखरी येथील दोघांचा करुण अंत..

एसटी बस ची दुचाकीला धडक..
अपघातात वाखरी येथील दोघांचा करुण अंत..

Pandharpur Live

पंढरपूर: प्रतिनिधी

वाखरी (ता पंढरपूर) येथील पंढरपूर-सातारा मार्गावर राजीवनगर येथे झालेल्या अपघातात वाखरी येथील दोघांचा आज करुण अंत झाला. आज बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

वाखरी येथील सोमनाथ आणि विशाल इंगोले हे दोघेजण मोटार सायकलवरून जात असताना सातारा कडून आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने त्यांना समोरुन जोराची धडक दिली. जेसीबीला ओव्हर टेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात बसने समोर आलेल्या मोटार सायकलला उडवले.

यात सोमनाथ संपत्ती इंगोले ( वय ५५) आणि विजय कैलास इंगोले हे गंभीर जखमी झाले होते, उपचारासाठी दोघांना रुग्णालय हलवण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्यांचा म्रुत्यु  झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दररोज अवश्य बघा पंढरपूर Live
आमचे Android Application तुमच्या मोबाईल. मध्ये अवश्य घ्या!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *