चंद्रभागा नदीचे आरतीमध्ये अडचण आणल्याने भावना दुखावतील

Pandharpur Live
पंढरपूर (प्रतिनिधी):- हरिद्वारला गंगा नदीची आरती होते.तर आळंदीला इंंद्रायणी नदीची आरती होते.त्याच धर्तीवर पंढरपूरला दररोज चंद्रभागा नदीची आरती एम.आय.टी.पुणे या संस्थेच्या वतीने महाद्वार घाटावरील एका बाजूस अडथळा न होता सूरु करण्यात आली आहे. परंतु काही व्यक्तींकडून यामध्ये अडथळा करण्यात येत आहे. तरी याबाबत त्वरीत उपाय योजना करावी अशी मागणी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे मा.अध्यक्ष ह.भ.प.भानुदास महाराज ढवळीकर व संत ज्ञानेश्‍वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्‍वर महाराज जोगदंड ,ह.भ.प.विठ्ठल महाराज चवरे,ह.भ.प.सचिन गोसावी,ह.भ.प.गोविंद पिंपळे,दत्तात्रय बडवे यांनी केली आहे.
             ही महाआरती आम्ही कितीही त्रास झाला तरी बंद करणार नसून आरतीस प्रतिबंध करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आम्ही त्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.या बाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हाधिकारी सोलापूर,पंढरपूर शहर पोलीस निरिक्षक,मुख्याधिकारी नगर परिषद पंढरपूर यांना फॅक्सद्वारे व समक्ष देण्यात आले आहे.     

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *