आषाढी वारीची कामे 10 जून पर्यंत पुर्ण करावीत  – जिल्हाधिकारी-राजेंद्र भोसले

Loading

Pandharpur Live
 पंढरपूर दि. 04:-पंढरपूर हे राज्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातून तसेच परराज्यातून लाखो भाविक येत असतात. आषाढी यात्रेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना व नागरीकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी सुरु असलेली कामे 10 जून पर्यंत पुर्ण करावीत तसेच या कामांचा दर्जा व गुणवत्ताही राखावी अशा सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले  यांनी दिल्या.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी  प्रविण देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे,प्रांताधिकारी संजय तेली, माळशिरसचे प्रांतधिकारी संजय जाधव, मोहोळचे प्रांतधिकारी रमेश शेंडगे, सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, तहसिलदार अनिल कारंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  एस.टी. राऊत, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे  यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणालेकी, येणा-या आषाढी यात्रे संदर्भात सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. येणा-या भाविकांना  सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे. तसेच पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढावीत, पालखी तळांवर  सोयी-सुविधा  पुरवाव्यात अशा सुचना दिल्या 65 एकर, पालखीतळ, नदीपात्र, पत्राशेड, याठिकाणी  शौचालयाची उपलब्धता व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, आरोग्य विभागाने जंतनाशक फवारणी, शुदध पिण्याचे पाणी आदी कामे वेळेत करावीत. नगर पालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचा सर्वे करुन त्याबाबत योग्यती कारवाई करावी, शहरातील रस्ते स्वच्छ ठेवावेत.तिर्थक्षेत्र आराखड्यातून सुरु असलेली  विकासकामे वेळेत पुर्ण करावीत अशा सुचनाही जिल्हाधिकारी भोसले यांनी संबधित विभागांना दिल्या  
मंदिर समितीने पत्राशेड, दर्शनरांग याठिकाणी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात. तसेच भाविकांना सुलभ व जलद पददर्शन, मुखदर्शन होण्यासाठी योग्य नियोजन करावे. आषाढी यात्रेपुर्वी संबधित विभागांनी  नेमून दिलेली कामे वेळेत पुर्ण करावी अशा सुचानाही जिल्हाधिकारी राजेंद्र भासले यांनी यावेळी दिल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातचे दर्शन घेतले. मंदिर समिती कडून भाविकांना देण्यात येणा-या सुविधांची माहिती घेतली.
                                                          00000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *