बाबा ग्रुपच्या वतीने वीर शिवा काशिद जयंती साजरी

Pandharpur Live

पंढरीत बाबा ग्रुपच्यावतीने वीर शिवा काशिद जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली आहे.येथील जाधवजी जेठाबाई धर्मशाळा येथे आयोजीत कार्यक्रमात वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेचे पुजन पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सह.पोलीस निरिक्षक दत्तात्रय खाडे व संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाभिक समाज युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सतिश चव्हाण,शहराध्यक्ष महेश माने, बाराबलुतेदार महासंघाचे अध्यक्ष भाई किशोर भोसले,बाळासाहेब देवकर आदी उपस्थित होते.बाबा ग्रुपचे संस्थापक व बेरड समाजाचे जिल्हाध्यक्ष  उत्तम चव्हाण यांनी यांनी या कार्यक्रमाचे महत्व विषद केले.
             यावेळी तुकाराम चव्हाण संतोष हिल्लाळ सचिन बोरकुळे वैभव अलदार संतोष मुटकुळे सुयॅकात माने रामा बंदपाटे भोला शिंदे महादेव शिंदे अनिल शेटे मंगेश शिरसागर सुमित पावर तेजस भोसले दिपक खंडागळे व बाबा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *