👁 11 Views

पत्रकारितेच्या माध्यमातूनच प्रश्‍न मार्गी लागतात

मंचर- विधानसभा अथवा लोकसभेत एखादा महत्त्वाचा प्रश्‍न मार्गी लागला नाही. तर पत्रकारितेच्या माध्यमातून प्रश्‍न मार्गी लागत आहे. पत्रकारांनी शोधपत्रकारिताबरोबर सोशल मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक्‍स मीडिया यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी केले.
मंचर (ता.आंबेगाव) येथील जीवन मंगल कार्यालयात आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ व हवेली तालुक्‍यातील पत्रकारांच्या एकदिवसीय कार्यशाळेत वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी खासदार शिवाजी आढळराव पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भाजपचे तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे, दैनिक प्रभातचे उपसंपादक श्रीकृष्ण पादीर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे, शरद पाबळे, सुभाष भारद्वाज, कार्याध्यक्ष कृष्णकांत कोबल, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, सरपंच दत्ता गांजाळे, जिल्हा परिषद सदस्या अरूणा थोरात, विष्णु हिंगे, अरुण गिरे, गणपतराव इंदोरे, रवींद्र करंजखेले, राजाराम बाणखेले, सुरेश भोर, शिवाजी लोंढे, डॉ. सदानंद राऊत, प्राचार्य पांडुरंग गायकवाड, प्राचार्य एल. झेड वाळुंज, सुनील बाणखेले, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश गुंजाळ , उपाध्यक्ष रवींद्र वाळके, सचिव भरत चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जयसिंग एरंडे, श्रीकृष्ण पादीर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील थिगळे, पूजा थिगळे, शरद घोडेकर यांनी केले, तर भरत चिखले यांनी आभार मानले.
ग्रामीण निमशहरी व शहरी पत्रकारांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. ऍक्रीडेशन कार्ड सर्व पत्रकारांना मिळाले पाहिजे. लोकप्रतिनिधी व पत्रकार हे जबाबदार घटक आहेत. समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा.
-शिवाजी आढळराव पाटील, खासदार

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *