👁 12 Views

गोहत्या बंदीच्या राजकारणात माणुसकीची प्रचिती!

इंदापूर- देशात गोहत्या बंदीवरून राजकारणाचे वारे जोरात वाहू लागले आहे. यात काही निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, माणुसकीच्या शहरात मुस्लिम युवकांनी चेंबरमध्ये गायीला बाहेर काढून जीवदान दिले आहे. त्यामुळे गायीला जीवदान देण्यासाठी जय बजरंग ग्रुप, महात्मा फुले ग्रुप, टिपू सुलतान, यंग सर्कल, शिवा ग्रुपच्या युवकांनी प्रयत्नाची शिकस्त केली. गायीला जीवदान देऊन माणुसकीची प्रचितीचे दर्शन घडविले. या सर्व युवकांचे कौतूक होत आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे.
इंदापूर येथे बसस्थानकाच्या आवारातील गटार लाईनच्या चेंबरमध्ये गाय पडली होती. शहरातील नासिर पठाण या युवकाला चेंबरमध्ये गाय पडल्याचे समजले. त्याने त्याच्या मित्र परिवारांना लगेच संपर्क करुन बसस्थानकावरच्या त्या चेंबरजवळ बोलावून घेतले. यावेळी जमलेल्या सर्व युवकांनी रात्रभर प्रयत्न करत गाईला जीवदान दिले. यासाठी सरडेवाडी येथील टोल नाक्‍यावरील क्रेन मागविली. क्रेनच्या साह्याने गाईला बाहेर काढण्यात आले. यावेळी नासीर पठाण या युवकाने मोठे धारिष्टय दाखविले. त्याने गाई वाचवण्यासाठी कसलाही विचार न करता तो थेट चेंबरमध्ये उतरला होता. तर विनोद राऊत याने क्रेनसाठी फोन केला. यावेळी इंदापूरातील युवक गणेश पवार, फिरोजखान पठाण, मुक्तार सय्यद, विशाल फोंडे, विजय किर्वे, ऋषिकेश काळे, सोमनाथ खरवडे, सोहेल शेख, शाहरुख शेख, बुना पवार, मच्छिंद्र कांबळे, ओंकार कांबळे, राहुल राऊत, वसिम मोमीन, प्रतिक शिंदे, विनोद राऊत, तोफिक बागवान, सौरभ मिसाळ, अमिर पठाण हे युवक गायीला काढण्यासाठी शिकस्तीने प्रयत्न करत होते. हे जमलेले सर्व युवक जय बजरंग ग्रूप, महात्मा फुले ग्रुप, टिपू सुलतान, यंग सर्कल, शिवा ग्रुपच्या युवकांनी समाजात माणुसकीची प्रचिती दाखवून दिली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *