👁 8 Views

दानवेंना सद्बुद्धी मिळण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने यज्ञ

बदलापूर : शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने यज्ञ करण्यात आला आहे. बदलापुरात आज सकाळी या यज्ञास सुरूवात करण्यात आली.

रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्यात शेतऱ्यांबद्दल असभ्य भाषा वापरत टिप्पणी केली होती. यावरुन राज्यभरात त्यांच्या या वक्तव्याचा संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. काही ठिकाणी आंदोलने तर काही ठिकाणी त्यांच्या माफी आणि राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणं करण्यात येत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीन कॉंग्रेसने थेट दानवेंचे मानसिक संतुलन सुधरावे आणि त्यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी बदलापूरच्या बेलवली भागात शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांच्या उपस्थितीत यज्ञ केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावसाहेब दानवेंचे मानसिक उपचार करावेत, अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने वर्गणी काढून त्यांचे उपचार करण्यात येतील, अशा शब्दात यावेळी राष्ट्रवादीने भाजपला फटकारले असल्याचेही सांगण्यात येत आहे.
राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात ***, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता. दरम्यान, या वक्‍तव्यावर मी कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरला, शेतकऱ्यांबद्दल नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला होता. तसेच शेतकऱ्यांची मने दुखावली असतील तर दिलगिरी करतो असे म्हणत त्यांनी सशर्त माफी मागितली होती. परंतु, त्यांच्या या माफीचा विरोधकांवर आणि शेतकऱ्यांवर काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *