👁 8 Views

पंढरपूर लाईव्ह तर्फे मातृदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा…

#मदर्स_डे.

कामाची दांडी झाली आज. लोणावळ्याला जरासं काम होतं.काम झालं.. घरी जायचं होतं.. उन्हानं जिवाची काह्यली झालेली.. आभाळात वांबाळ आलेलं.. तीन नंबर प्लॅटफॉर्मजवळच्या तिकीटघरातुन तिकीट काढलं
आन् पाय मोजीत मोजीत निघालो गाडीला.. कडेला चांगली डेरेदार झाडं लावलीयेत.. मस्त सावली है.
त्या झाडांखाली रस्त्यावरची फाटकी गरीबी लेकुरवाळ्यांसह तळ ठोकून होती..कुणी झोपलय, कुणी जेवतय, कुणी बिडी शिलगावतय, कुणी पोटासाठी तिन दगडांची चुल मांडून काहीतरी शिजवतय..सगळं बघत बघत.. मी चाललोय आपल्या नादात..
एक मळकट कपड्यांची व तितक्याच मळकट चेहर्‍याची एक लेकुरवाळी आपल्या नऊ दहा महीन्यांचं
रांगतं आणि बसकं पोर.. रेल्वेरुळांच्या मधल्या नाल्याच्या कडंला बसवून त्याला आंघूळ घालत व्हती.
बिस्लरीची बाटली अर्धी कापून त्याचं टमरल बनवलेलं..
एकदम गाऽर पाणी.. नाल्याचं पाणी.. अंगाला लावायला कपड्याचा साबण.. टाईड बार.
पण एक गोष्ट खुप भावली.. त्या मायलेकांच्या चेहर्‍यावरचं समाधान..
तिनं साबण लावावा.. ते खिदळायचं.. तिनं ते गाऽर पाणी अंगावर ओतावं… ते आणखीन जोरात हसावं…
त्या नाल्याजवळचा आनंद…तो अगम्य भाषेत चाललेला त्यांचा संवाद…साक्षीला मी स्वतः आजूबाजूच्या चराचर सृष्टीचा विचार न करता
मनसोक्त आनंद उपभोगता येणं दुरापास्त गोष्ट आहे..
जी इथं पाहायला मिळाली..

पंढरपूर लाईव्ह तर्फे मातृदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.

मंडळी रामराम.

©Ganesh Narayanrao Phalke

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *